बारामती : शहरात शासनाच्या आदेशानुसार कलम १४४ अन्वये संचारबंदी लागु करण्यात आली आहे.त्यानंतर देखील शहरातील नागरीकांचा वावर वाढला आहे. शेवटी पोलीस प्रशासनाने विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोघा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.शहराच्या चारही बाजुने नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येत आहे. फौजदारी दंड संहिता कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू असलेने कोणीही विनाकारण रस्त्यावर दुचाकीवरून फिरू नये, अगर चौकांमध्ये गर्दी करू नये. रस्त्यावर गर्दी आहे की नाही हे पाहण्याकरता लोक रस्त्यावर येत आहेत. नागरिकांच्या सुविधाकरता दवाखाने ,मेडिकल, किराणा दुकान, फळ मार्केट, भाजी मार्केट इतर अत्यावश्यक सुविधा चालू ठेवण्यात आलेले आहेत. परंतु ,कोणतेही कारण नसताना लोक रस्त्यावर फिरताना दिसून येत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे. जर लोकांनी सहकार्य केले नाही तर संचार बंदीचे उल्लंघन म्हणून भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांमधील कलम पाच अन्वये सार्वजनिक ठिकाणी विनाकारण आल्यामुळे अमन अरुण पाटोळे (वय २६) तानाजी आण्णा पवार (वय ३२ ,दोघे रा. शेंडे वस्ती ,बारामती) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विनीत कुमार (वय १९,रा.कृष्णेरी,तांदुळवाडी),विलास र. मोहन (वय २०,रा. तांदुळवाडी),कुमार चिंनप्पा (वय १९,रा. तांदुळवाडी),वेंकटेश वेळे (वय १९,रा.तांदुळवाडी), वासुदेव कमळे (वय १९) हे सर्वजण एकाच ठिकाणी पाच जण मिळुन आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सचिन पोपट ढमाळ (वय ३२, रा.कसबा,बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे शिरगांवकर यांनी सांगितले. तसेच त्या नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी (दि २३) संचारबंदी लागु केल्यानंतर देखील रस्त्यावर विनाकारण वावरणाºया नागरिकांना पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे.शहराच्या चारही बाजुने नाकाबंदी करण्यात आली आहे.शहरात प्रवेश करणारे,शहराबाहेर जाणा?्यांची चौकशी करण्यात येत आहे. आवश्यक महत्वाचे कारण असल्यानंतरच पोलीस संबंधिताना बाहेर जाण्यास,प्रवेश करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
Corona virus : बारामतीत जमावबंदीचा भंग केल्याने आठ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 5:20 PM
तीन गुन्हे दाखल, शहराच्या चारही बाजुने नाकाबंदी
ठळक मुद्देदवाखाने ,मेडिकल, किराणा दुकान, फळ मार्केट, भाजी मार्केट इतर अत्यावश्यक सुविधा चालू