राजगुरुनगर: खेड तालुक्यात राजगुरुनगर शहरालगत राक्षेवाडी येथे एक ४० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. अशी तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांनी दिली. त्यामुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली असुन भीतीदायक वातावरण तयार झाले आहे.पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात डॉक्टरच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करत होता. तो दिवसाआड पुणे येथे कामास जात होता. १२ मे रोजी या रुग्णास ताप आला होता. त्यामुळे तो शहरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेत होता. येथे बरे न वाटल्याने हा रुग्ण पीएमटी बसने पुण्याला गेला सोमवारी दि. १३ रोजी तो जहाांगीर हॉस्पिटलला अॅडमिट झालेला आहे. त्यांची पत्नी ही सेझ परिसरातील निमगाव (ता. खेड) येथे एका कंपनीत कामास होती. पत्नी व दोन लहान मुलाला तपासणीसाठी पुणे येथे पाठवून देण्यात आले आहे. तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच त्या व्यक्तीची पत्नी निमगाव ता खेड येथे एका कंपनीत कामाला होती ते कंपनीचे युनीट बंद करण्यात आले आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या कंपनीतील २९ महिलांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.प्रशासनाने त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरु केले असल्याचे तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले.