राजगुरूनगर: राजगुरूनगरला येथे ३२ वर्षीय स्थानिक महिला कोरोनाग्रस्त आढळून आली आहे. त्यामुळे राजगुरुनगर शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या मुळे राजगुरुनगरवासियांची धाकधूक वाढली आहे.
तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५८वर पोहचली असुन दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात आत्तापर्यंत एकूण ५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील ४० जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर २ व्यक्तींचा बळी गेला आहे. सध्या१६ कोरोनाग्रस्त व्यक्ती उपचार घेत आहेत दरम्यान, राजगुरुनगर नगर परिषेदेच्या हद्दीत आज एका ३२वर्षीय आजारी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.कोरोनाचा संसर्ग झालेला शहरातील व नगर परिषद हद्दीतील हा पहिला रुग्ण आहे. राजगुरूनगर मध्ये अद्याप एकही रुग्ण नव्हता.स्थानिक रहिवासी असलेल्या या महिला रुग्णामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांची धाकधूक वाढली आहे. राजगुरूनगर व कडाचीवाडी(चाकण) येथे गुरुवारी एक एक रुग्ण आढळुन आला.तर कडाचीवाडी येथे रुग्णच्या संपर्कात असलेल्या १७ जणांपैकी अनेकांना तपासणी करण्याअगोदर तापाची थेट लक्षणे दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे येथील रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता व भीती व्यक्त होत आहे.तसेही चाकण परिसरातील गावांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढते आहे. चाकण ३ तसेच चाकण जवळील येलवाडी-४,नाणेकरवाडी ३,म्हाळुंगे,गोलेगाव, खराबवाडी प्रत्येकी एक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. साकुर्डी गावातील एक प्रसूती झालेली महिला म्हाळुंगे कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहे.