शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Corona virus : पुणे पोलीस दलात कोरोनामुळे चौथा बळी; सहायक पोलीस उपनिरीक्षकांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 11:44 AM

कोरोनाशी लढताना आतापर्यंत पुणे पोलीस दलातील चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. पुणे शहर पोलीस दलातील कोरोनाचा चौथा बळी आहे. सुरेश सीताराम दळवी (वय ५०) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सुरेश दळवी हे वाहतूक शाखेच्या सिंहगड विभागात नेमणूकीला होते.  त्यांना अंगदुखी व अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांची १४ ऑगस्ट रोजी कोरोनाचा चाचणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना लवळे येथील सिंबायोसिसच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे १४ दिवस उपचार केल्यानंतर त्यांनी २९ ऑगस्ट रोजी घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर १४ दिवस घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांच्या भावाने त्यांना रुग्णालयात नेले. परंतु, उपाचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.कोरोनाशी लढताना आतापर्यंत पुणे पोलीस दलातील चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलीस दलात कोरोनाचा फैलाव मर्यादित होता. त्यानंतर अनलॉकच्या काळात शहरातील नागरिकांबरोबरच पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरु लागला आहे. आतापर्यंत ७०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७५ टक्के बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू