शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Corona virus : मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन झालेल्या पुण्यातील 'जम्बो कोविड' रुग्णालयात त्रुटीच त्रुटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 12:05 PM

जम्बो कोविड रुग्णालयातील वैद्यकीय असुविधांवरुन मागील दोन दिवसांपासून गोंधळ सुरु

ठळक मुद्देमहापालिकेकडून ‘पीएमआरडीए’ला पत्र; सुधारणा करण्याच्या सूचना

पुणे : मोठा गाजावाजा करीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयातील असुविधांवरुन मागील दोन दिवसांपासून  गोंधळ उडालेला असतानाच पुणे महापालिकेने केलेल्या पाहणीमध्ये त्रुटीच त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी तात्काळ दूर करण्याबाबतचे पत्र आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे यांना देण्यात आले आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करुन महाराष्ट्र शासन, महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने 800 बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे. येथे वैद्यकीय सेवा पुरवठादार म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल्स सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला काम देण्यात आले आहे.  तर, ‘एएए हेल्थकेअर पुणे’ यांना प्रधान सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. जम्बोच्या व्यवस्थापनाबाबत पालिकेकडून वारंवार बैठका घेण्यात आल्या आहेत. जिल्हा टास्क फोर्सने मंगळवारी केलेल्या पाहणीत तसेच पालिका आयुक्तांनी बुधवारी केलेल्या पाहणीमध्ये भरपूर त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या दुर करण्याची मागणी पीएमआरडीएकडे करण्यात आली आहे.

काय आहेत त्रुटी?1. 800 बेडसाठी आवश्यक वैद्यकीय तज्ञ अधिकारी वर्ग व वैद्यकीय कर्मचारी मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.2. जम्बोमधील रुग्णांना नाश्ता व जेवण वेळेत मिळत नाही.3. डेडबॉडी मॅनेजमेंट व्यवस्थित होत नसल्याने आयसीएमआर पोर्टलवर नोंदणी करणे शक्य होत नाही.4.  संशयित रुग्णांकरिता 50 बेड उपलब्ध करण्याचे निर्देश असूनही केवळ दहाच बेड उपलब्ध आहेत.5. डेटा एंट्री ऑपरेटर पुरेशा प्रमाणात नाहीत.6. बाधित रुग्णांना दाखल करुन घेणे अपेक्षित असतानाही ओळख व रुग्णाचा इतिहास उपलब्ध नसल्याचे कारण देत दाखल करुन घेतले जात नाही.7. कर्मचाऱ्यांचे अद्ययावत हजेरीपत्रक उपलब्ध नाही.8.  एएए हेल्थकेअर पुणे प्रिन्सिपल कन्सल्टंट यांचे लाईफलाईन व अन्य यंत्रणांवर नियंत्रण नाही.9. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्ण दाखल करुन घेण्यास अधिक वेळ लागतो.10. सर्व संबंधित यंत्रणांमध्ये आपसात समन्वय नाही. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPMRDAपीएमआरडीएCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcommissionerआयुक्त