शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
2
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
3
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
4
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
5
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?
6
अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद
7
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
8
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
9
निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ
10
जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त
11
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
12
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
13
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
14
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
15
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
16
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
17
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
18
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
19
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
20
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?

कौतुकास्पद! भल्या भल्या देशांनी हात टेकले, पण पुणे जिल्ह्यातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 8:38 PM

पुणे जिल्ह्यातील ४४२ ग्रामपंचायती झाल्या आत्तापर्यंत कोरोनामुक्त

पुणे : भारतासह संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना महामारीला पुणे जिल्ह्यातील ४८ गावांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील आपल्या गावात शिरकाव करून दिला नाही. या गावांमध्ये आता पर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नसून, यातील बहुतेक सर्व गावे दुर्गम भागातील आहेत. दरम्यान जिल्ह्यातील  ४४२ ग्रामपंचायती आज अखेर कोरोना मुक्त झाल्या आहेत. 

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात ९ मार्च २०२० रोजी सापडला आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर एक महिन्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागातून ग्रामीणभागात पसरला. त्यानंतर पहिल्या लाटेत ऑक्टोबर, सप्टेंबर महिन्यात संपूर्ण ग्रामीण भागात कोरोना महामारीची लागण झाली. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर हजारो गावे कोरोनाच्या विळख्यात सापडली. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये मिळून जिल्ह्यातील १३५५  ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाची बाधा झाली. तरीदेखील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. कोरोना ची दुसरी लाट ओसरत असल्याने हळूहळू गावे देखील कोरोना मुक्त व्हायला सुरुवात झाली आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये आतापर्यंत २लाख ६० हजार कोरोना बाधित रुग्ण आहेत.  त्यातील दोन लाख 21 हजार 653 रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे सद्यस्थितीत ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक बाधित रुग्ण हवेली तालुक्यात असून त्यांची संख्या ६० हजारांपर्यंत गेली आहे तर त्याखालोखाल ३० हजार रुग्ण खेड तालुक्यात आहे. दाखल रुग्णांची संख्या खेड तालुक्यात चार हजारांपेक्षा जास्त सोडून जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्त