बारामती: बारामती शहरासह ग्रामीण भागात देखील उदासिन कोरोनाबाधितांमुळे कोरोनावाढीचा विळखा घट्ट होऊ पाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने बारामती, माळेगाव हद्दीतील गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीसह अन्य ११ गावांमध्ये 'हाय अलर्ट'जारी करण्यात आला आहे.तसेच १५ गावांमध्ये अलर्ट जारी केला आहे. दररोज सरासरी ३०० ते ४०० नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून रुग्णसंख्या वाढत असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे.बारामती शहरात आजपर्यंत २० हजार ५९६ तर, गेल्या ४० दिवसांत ११ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आजपर्यंत एकुण १६ हजार २७५ रुग्ण बरे झाले आहेत.५ एप्रिलपासूनच शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र ५ मेपर्यंत रुग्णवाढीचा वेग रोखण्यास प्रशासनाला अपयश आले.कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये ५ मे ते ११ मे दरम्यान लॉकडाऊन लागू आहे. यात दूध विक्रीसाठी सकाळी ते ९ वाजेपर्यंत मुभा आहे. तर मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा, भाजी मंडई या काळात बंद राहणार आहे.मंगळवारी(दि ११) लॉकडाऊनची मुदत संपणार आहे.त्यामुळे आणखी सात दिवस कडक लॉकडाऊन सुरु राहणार का,याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
गेल्या सात दिवसांपासुन सुरु असलेल्या कडक लॉकडाऊनचा काहीसा परिणाम गेल्या दोन तीन दिवसांपासुन दिसु लागला आहे.बारामती नगर परिषदेतील हाय अलर्ट आणि अलर्टवर असणारी गावे बारामती नगर परिषद, माळेगाव नगर पंचायत, गुणवडी, मुढाळे, झारगडवाडी, होळ, कटफळ, सोनगाव, लाटे, मुरुम, काºहाटी, सावळ, शिर्सूफळ. काटेवाडी, निरावागज, पणदरे, वंजारवाडी, वडगाव निंबाळकर, कोर्हाळे बुद्रुक, डोर्लेवाडी, पिंपळी, मळद, मेखळी, सांगवी, गोजुवाडी, खांडज, मोरगाव, कन्हेरी.——————————————