शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

Corona virus : अबब! पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक ९३७ कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या १९ हजार ४२

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 10:02 AM

विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी ३४४ जण अत्यवस्थ

ठळक मुद्देतब्बल ६३१ रुग्ण झाले बरे,आजारातून बरे झालेल्यांची ११ हजार ६७१

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांमध्ये आजवरची सर्वाधिक ९३७ ची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १९ हजार ४२ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ६३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३४४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ६ हजार ६९५ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गुरुवारी रात्री साडेदहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ९३७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १२, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ६७२ तर खासगी रुग्णालयांमध्ये २५३ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३४४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २८८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात गुरूवारी १४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६७६ झाली आहे. दिवसभरात एकूण ६३१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ३३६ रुग्ण, ससूनमधील १६ तर  खासगी रुग्णालयांमधील २७८ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ६७१ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ६ हजार ६९५ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार १४० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख २४ हजार १९८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे................

एकूण बाधित रूग्ण : २४९४४पुणे शहर : १९०११पिंपरी चिंचवड : ३८५०कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : २०८३मृत्यु : ८०६

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका