Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 04:27 PM2020-04-30T16:27:02+5:302020-04-30T16:27:49+5:30

कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती..

Corona virus : Implement corona preventive measures more effectively in the pune district | Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

Next
ठळक मुद्देसध्या सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत आयुक्तांशी विशेष नियुक्त अधिकाऱ्यांची चर्चा 

पुणे : पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने शहरी भागात कोरोना विषाणूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ही वाढ रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार राज्य शासनाने नियुक्त केलेल्या विशेष चार आयएएस अधिकारी यांनी केला. यासाठी या अधिकाऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागात सध्या राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनाचा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली.
पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करणार आहेत,. या चार ही अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कोरोना प्रतिबंधक कार्यवाहीच्या दृष्टीने या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील नियोजनाची दिशा ठरविण्यात आली.
पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्ण अधीक असलेल्या परिसरात आणखी काय उपाययोजना करता येतील, त्यादृष्टीनेही चर्चा झाली. डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा यासह वेगवेगळ्या विकारांमुळे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि असे विकार असणा-या व्यक्ती कोरोनाबाधित होवून तो रोग त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्या आहेत,त्या भागात    गतीने आरोग्य तपासणीच्या नियोजन तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने केल्या जात असलेल्या साईसुविधा, क्वारंटाईन सुविधा, तपासणी केंद्रे आदी विषयांबाबतही सविस्तर चर्चा झाली.
------ 
सध्या सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावी राबविण्यासाठी सहकार्य करणे हा आमच्या नियुक्तीचा मुख्य उद्देश आहे. त्यादृष्टीने गेल्या दोन दिवसांपासून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या सोबत चर्चा करून सध्या सुरू असलेल्या उपाययोजनाची माहिती करून घेण्यात आली. आता यामध्ये नव्याने काही करता येईल, नवीन रूग्णांची संख्या व मृत्यु दर कमी करण्यासाठी काय करावे लागेल सविस्तर चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीने लवकरच सुरू असलेले प्रयत्न अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील.
- अनिल कवडे, सहकार आयुक्त
------ 
सध्या शहरामध्ये विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त चांगल्या पद्धतीने काम करतच आहेत. आम्ही चार विशेष नियुक्त अधिकारी आमच्या विभागीची जबाबदारी संभाळून आयुक्त, जिल्हाधिकारी यांना मदत करणार आहोत. 
- कौस्तुभ दिवेगावकर, भूजल सर्व्हेक्षण संचालक

Web Title: Corona virus : Implement corona preventive measures more effectively in the pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.