Corona virus : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ८ दिवस कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करा : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 07:29 PM2020-04-18T19:29:20+5:302020-04-18T19:36:52+5:30

आता कुठल्याही परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढता कामा नये...

Corona virus : Implement strict lockdown for 8 days for Corona prevention in Pune and Pimpri-Chinchwad: Ajit Pawar | Corona virus : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ८ दिवस कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करा : अजित पवार

Corona virus : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ८ दिवस कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करा : अजित पवार

Next
ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजितशासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार

पुणे :  पुण्यात दिवसागणिक झपाट्याने वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूदर ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. पोलीस प्रशासनाने पाहिजे तर कडक धोरण अवलंबवावे. पण आता  कुठल्याही परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढता कामा नये. कोरोना प्रतिबंधासाठी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात आठ दिवस कडक लॉकडाऊनला पर्याय नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिले. 
 पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बीष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणा?्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यात येईल. तसेच ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन समितीमधून 25 टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार शासनाने यापूर्वीच दिले आहेत
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कन्टेंन्टमेंट झोन परिसरात कडक निर्बंध घालण्यात यावेत. या भागातील नागरिकांना वारंवार ये- जा करता येणार नाही. त्याचबरोबर या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे व अन्य परिसरात स्वच्छेतेची विशेष दक्षता बाळगावी. येथील नागरिकांना फ्ल्यू सदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. हॉटस्पॉट असणा?्या ग्रामीण भागात देखील कडक निर्बंध अवलंबवावे लागणार आहेत. कोल्हापूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपच्या धर्तीवर पुण्यातही असा उपक्रम राबवावा.
पोलिसांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीवर भर द्यावा. तसेच पोलीसांना एन-95 मास्क व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन द्यावीत. शहर आणि ग्रामीण भागातील मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरु करावेत. यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. रेशन दुकानांव्दारे धान्य वितरण सुयोग्य व सुनियोजीत करण्यात यावे. कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहता कामा नये याची दक्षता घ्यावी.
शैक्षणिक दृष्टया विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्राचार्यांना संस्थेत उपस्थित राहण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे, अशी सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका?्यांना याबाबत निर्देश दिले. तसेच कोविड -19 सेवा देणा?्या खासगी रुग्णालयांना शासनाने मदत करावी, अशी सूचनाही राज्यमंत्र्यांनी बैठकीत केली असता निश्चितच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.
 

Web Title: Corona virus : Implement strict lockdown for 8 days for Corona prevention in Pune and Pimpri-Chinchwad: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.