शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

Corona virus : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महापालिकेकडून मनुष्यबळ पूर्ववत करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 9:09 PM

बांधकाम-मिळकत कर-पाणी पुरवठा विभागाचे मनुष्यबळ 'कोरोना ड्युटी'तून मुक्त 

ठळक मुद्देमहापालिकेने एकूण २७ पैकी २१ कोविड केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात केले बंदगेल्या सहा महिन्यांपासून पालिकेची कामे ठप्प आजवर जवळपास ४०० अधिकारी-कर्मचारी आपापल्या विभागात रुजू

पुणे : महापालिकेच्या कोविड सेंटरसह कोरोनाच्या विविध कामांसाठी तैनात करण्यात आलेले मनुष्यबळ पुन्हा त्या-त्या विभागांना देण्यात सुरुवात करण्यात आली आहे.  त्यामुळे पालिकेच्या संबंधीत विभागांचे काम सुरू होण्यात मदत मिळणार आहे. पुण्यामध्ये ९ मार्च रोजी राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच गेली. या काळात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मनुष्यबळ कमी पडू लागले होते. सर्वेक्षणासह विविध सेंटरवरील स्वच्छता, कार्यालयीन कामकाज, तपासण्या आदींसाठी महापालिकेच्या अन्य विभागांचे मनुष्यबळ पुरविण्यात आले होते. बांधकाम विभाग, विद्युत, पाणीपुरवठा, मिळकत कर, आरोग्य, लेखापरीक्षण, सामान्य प्रशासन, मालमत्ता व्यवस्थापन आदी वेगवेगळ्या वीस विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश यामध्ये होता.

 गेल्या सहा महिन्यांपासून पालिकेची कामे ठप्प झाली होती. कोरोनाची रुग्ण संख्या कमी होताना दिसते आहे. या सोबतच जम्बो रुग्णालय आणि बणेरच्या कोविड-१९ रुग्णालयामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. यासोबतच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू झाल्याने पालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्ण संख्या कमी झाली. त्यामुळे महापालिकेने सुरुवातीच्या काळात सुरू केलेले विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर आता हळूहळू बंद करायला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या एकूण २७ पैकी २१ कोविड केअर सेंटरला तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आले आहे. डॉ. नायडू रुग्णालय, बाणेर कोविड सेंटर, लायगुडे दवाखाना, खेडेकर दवाखाना, सिंहगड हॉस्टेल कोंढवा आणि विमान नगर अशा  सहा ठिकाणचे सेंटर सुरू आहे.  बंद केलेल्या सेंटरवरील मनुष्यबळ आता हळूहळू त्या-त्या विभागांना पुन्हा पाठविण्यात येत आहे. हे मनुष्यबळ आपापल्या विभागात रुजू होत असल्याने त्या विभागाची कामे आता सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. ---------- आजवर जवळपास ४०० अधिकारी-कर्मचारी आपापल्या विभागात रुजू झाले आहेत. यामध्ये बांधकाम विभागाचे  ३० उप अभियंता, ड्रेनेज पाणीपुरवठा लचे २४ उप अभियंता आणि मिळकत कर विभागाच्या १५० अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तhospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी