४०२ रुग्ण अत्यवस्थ, १६ जणांचा मृत्यूपुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत गुरूवारी १ हजार ६ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २५ हजार १७४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ५८१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४०२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ८ हजार ८०९ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गुरूवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १००६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १२, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ५३९ तर खासगी रुग्णालयांमध्ये ४५५ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४०२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ७५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३२७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात गुरूवारी १६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७८६ झाली आहे. दिवसभरात एकूण ५८१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ३८० रुग्ण, ससूनमधील २३ तर खासगी रुग्णालयांमधील १८७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १५ हजार ५७९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ८ हजार ८०९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ९२९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ५० हजार ६२८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे ७५५ लोकांची तपासणी करण्यात आली असून या किटद्वारे एकूण ४ हजार ६८४ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १००६ कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या २५ हजार १७४
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:37 AM
दिवसभरात कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या ५८१
ठळक मुद्देविविध रुग्णालयात दाखल असलेले ४०२ रुग्ण अत्यवस्थ, १६ जणांचा मृत्यू