पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून दोनशेच्या जवळपास वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी निम्म्याने कमी होऊन १०२ इतकी झाली आहे. तर आज आणखी ४९ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आजपर्यंत ३ हजार ५९८ इतकी झाली असली तरी, यापैकी तब्बल १ हजार ८०० जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. यामुळे शहरातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही सद्यस्थितीला १ हजार ५९९ इतकीच आहे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट भागातील कोरोना संशयित नागरिकांची तपासणीचे प्रमाण वाढल्यापासून कोरोना रूग्णांची वाढ दिसून येत आहे. मात्र, तपासणीच्या तुलनेत मात्र हे प्रमाण ९ टक्केच असल्याचे गेल्या दहा दिवसांपासून दिसून येत आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात १ हजार ४१९ जणांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १०२ जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले असून, यातील ४५ जण खासगी हॉस्पिटलमध्ये, ३८ जण नायडू हॉस्पिटल व पालिकेने उभारलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये तर १९ जण ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. आज पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, यापैकी चार जण हे खासगी हॉस्पिटलमधील तर एक जण ससून हॉस्पिटलमधील आहेत. शहरातील एकूण अॅक्टिव्ह रूग्णांपैकी १४८ रूग्णांची प्रकृती गंभीूर असून, ५० जण व्हेंटिलेटरवर आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १९९ झाली असली तरी, त्यांना अन्य आजाराने ग्रासलेले होते.
..........................
जिल्ह्यात 159 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची वाढ ; 5 मृत्यू पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवार (दि.18) रोजी एका दिवसांत 159 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले.तर 5 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. तर सोमवारी एका दिवसांत 55 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले. आता पर्यंत जिल्ह्यात 4 हजार 177 रुग्ण झाले असून, आतापर्यंत 2 हजार 69 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी 1 हजार 232 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी 159 रूग्णांचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला, यामुळे आतापर्यंत एकूण 211 मृत्यू झाले आहेत. यामुळे सध्या जिल्ह्यात 1 हजार 897 ॲक्टीव रुग्ण आहेत. तर 166 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ----- एकूण बाधित रूग्ण : 4177पुणे शहर : 3628पिंपरी चिंचवड : 222कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 327मृत्यु : 211घरी सोडलेले : 2069