पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मंगळवारी १ हजार ५१२ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४० हजार ७१५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ८०५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ६१६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ४३४ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६१६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ९९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ५१७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. दिवसभरात ३० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १०३५ झाली आहे. दिवसभरात एकूण ८०५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २२ हजार २४६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १५ हजार ४३४ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार २२२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २ लाख १५ हजार ४४४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
Corona virus : पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात १५१२ रूग्णांची वाढ; ३० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 10:12 PM
कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४० हजार ७१५ झाला.
ठळक मुद्दे८०५ रुग्ण झाले बरे ; तब्बल ६१६ अत्यवस्थआजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २२ हजार २४६