पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत बुधवारी १ हजार ५८४ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ६९ हजार २३५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १ हजार ४४९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ७३५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८१२ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७३५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २९० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ४९५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात २८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ६२१ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ४४९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५२ हजार ८०२ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ८१२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार २१३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ३ लाख ३६ हजार २५४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
Corona virus: पुण्यात बुधवारी दिवसभरात १५८४ कोरोनाबाधितांची वाढ,१ हजार ४४९ रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 1:56 PM
आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५२ हजार ८०२
ठळक मुद्देतब्बल ७३५ अत्यवस्थ : १५८४ रूग्णांची वाढ, २८ जणांचा मृत्यूकोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ६९ हजार २३५ ; सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८१२