पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये गुरूवारी दिवसभरात ३६३ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ०४४ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २२६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८०८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५५९ झाली आहे. पुण्याबाहेरील १ मृत्यूची नोंद करण्यात आली. दिवसभरात एकूण २६८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ५१४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७५ हजार ११७ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ४४ झाली आहे. ------------- दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार २७० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ७५ हजार ५४८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. .... औद्योगिकनगरीत दिवसभरात १७१ जण पॉझिटिव्ह
पिंपरी : औद्योगिकनगरीत दिवसभरात १७१ जण पॉझिटिव्ह आढळले असून १३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ६४४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोनाने दिवसभरात दोघांचा बळी घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नाव्हेंबरच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णसंख्या अडीचशेच्या आत आली होती. ही आता दीडशेच्या आत आली आहे. शहरातील विविध रुग्णालयात २ हजार ६९९ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ३ हजार १३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ३५९ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात १९७१ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ७१४ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्तीचा आलेख वाढत असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजार ६०३ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४ हजार ९४८ वर पोहोचली आहे.