पुणे : पुणे जिल्ह्यात नेहमीप्रमाणे शुक्रवारी( दि.१२) रोजी एका दिवसांत तब्बल ३९०रुग्ण वाढले. परंतु रुग्ण वाढीपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असून १९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दरम्यान ग्रामीण भागात प्रथमच एका दिवसांत २७ उच्चांकी रूग्ण वाढ झाली. यामुळे आता पर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ हजार २०२ झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. असे असले तरी कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढले असून, सध्या जिल्ह्यात सरासरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६० ते ६० टक्के व ग्रामीण भागात हेच प्रमाण ७५ टक्क्यांपर्यत वाढले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसांत ११ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता पर्यंत पुणे जिल्ह्यात ४७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर शहरी भागासह ग्रामीण व कँटोन्मेंट भागात देखील झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल २७ नवीन रुग्णांची भर पडली. ही बाब आता जिल्हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. ....शुक्रवारी नव्याने ३०५ कोरोनाबाधितांची नोंद पुणे शहरातील स्वॅब तपासणीचे प्रमाण वाढल्यापासून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्ण वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या नव्या रूग्णांमध्ये आता शहरातील कंटन्मेंट झोनबरोबरच झोन बाहेरील रूग्ण वाढही लक्षणीय असून, शुक्रवारी नव्याने ३०५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये २२२ रूग्ण गंभीर असून, ४९ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ३९५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, यापैकी २२५ जण पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व आयसोलेशन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर ससूनमध्ये १५ व खाजगी हॉस्पिटलमध्ये ६५ रूग्ण दाखल आहेत. आज कोरोनामुक्त झालेल्या १४२ जणांपैकी १०३ जण हे विविध आयासोलेशन सेंटरमधील असून, खाजगी हॉस्पिटलमधील २६ जण तर ससून हॉस्पिटलमधील १३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ आजपर्यंत शहरात एकूण कोरोनाबाधितांपैकी ५ हजार ९२४ कोरोनामुक्त झाले असून, ही टक्केवारी ६५.४२ टक्के इतकी आहे. पुणे शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत ९ हजार ८२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आज मृत्यू झालेल्या १२ जणांचा समावेश आहे. ------
एकूण बाधित रूग्ण : ११२०२पुणे शहर : ९१६६पिंपरी चिंचवड : १०७८कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ९५८मृत्यु : ४७१बरे झालेले रुग्ण : ७११०