पुणे : शहरात शुक्रवारी ४ हजार ७७७ कोरोना संशयित रूग्णांची तपसणी करण्यात आली असून, यामध्ये ४०६ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. एकूण तपासणीच्या तुलनेत आजची कोरोनाबाधित रूग्णांची टक्केवारी ही साडेआठ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४१३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २४९ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार १२४ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ४०१ इतकी आहे. आज दिवसभरात ३२० जण कोरोनामुक्त झाले असून, ३ जणांचा मृत्यू झाला आहेत. यातील एक जण पुण्याबाहेरील आहे. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ४५१ इतकी झाली आहे.आजपर्यंत ८ लाख ८ हजार ६४८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ६८ हजार ८६६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ५९ हजार १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.