पुणे : रविवारी पुणे शहरात दिवसभरात कोरोना बाधित ५२३ रूग्णांची वाढ झाली असून, २२ जणांचा मृत्यू झाला आहे पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १६ हजार १२५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ३२८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयातील ३२४ रुग्ण अत्यवस्थ असून ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही ६ हजार ६५ इतकी आहे. शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ५२३ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २९४ तर खासगी रुग्णालयांमध्ये २१३ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३२४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात रविवारी २२ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६१३ झाली आहे. दिवसभरात एकूण ३२८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २८३ रुग्ण, ससूनमधील १७ तर खासगी रुग्णालयांमधील २८ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९ हजार ४४७ झाली आहे. -------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६९३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ८ हजार ३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
Corona virus : पुण्यात रविवारी दिवसभरात ५२३ कोरोना रुग्णांची वाढ , एकूण बधितांची संख्या १६ हजार १२५ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:40 PM
रविवारी आजारातून बरे झालेल्यांची संख्या ३२८ इतकी आहे.
ठळक मुद्देविविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांपैकी 324 जण अत्यवस्थ