शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात ५३१ कोरोना रुग्णांची वाढ, एकूण संख्या १४ हजार १८५

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 11:30 AM

शहरातील स्वाब चाचणी पोहचली १ लाखांच्या घरात

ठळक मुद्देपुण्यात ३१६ रुग्ण अत्यवस्थ, १३ जणांचा मृत्यू

पुणे : महापालिकेने सुरू केलेल्या स्वाब चाचण्यांचा आकडा एक लाखाच्या पार गेला आहे. शहरात गुरूवारी दिवसभरात ५३१ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १४ हजार १८५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २०२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३१६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ५ हजार ३२५ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

गुरुवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ५३१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २९४ तर खासगी रुग्णालयांमध्ये २२६ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३१६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २५३ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 

शहरात गुरूवारी १३ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५५८ झाली आहे. दिवसभरात एकूण २०२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १४२ रुग्ण, ससूनमधील ०६ तर  खासगी रुग्णालयांमधील ५४ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ३०२ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ५ हजार ३२५ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ४५३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ६७७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस