शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

Corona virus : प्रतिकारशक्ती वाढवा; कोरोनाला हरवा !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 4:00 PM

कोरोनाचा विषाणू शरीरात शिरला, की तो प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो व शरीराला नामोहरम करतो.

ठळक मुद्देडॉक्टरांचा सल्ला : फळे, पालेभाज्या आणि हवी व्यवस्थित झोपकोणतेही औषध न घेता विषाणूंना निष्प्रभ करण्याची शरीराची शक्ती.

पुणे : ‘कोरोनाचा धसका बसला असला, तरी काळजी करायचे कारण नाही. तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर कोरोनाच काय, कोणताही साथीचा आजार तुमच्यासमोर टिकणारच नाही,’ असा विश्वास ‘प्रतिकारशक्ती’ या विषयावर आयुर्वेदिक व अ‍ॅलोपथी या दोन्ही वैद्यकीय उपचार पद्धतींमधील डॉक्टरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. ‘भारतीय आहार घ्या व नीट झोप घ्या अशा दोनच गोष्टी करा; तुमची प्रतिकारशक्ती वाढेल,’ असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.कोरोनाचा विषाणू शरीरात शिरला, की तो प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो व शरीराला नामोहरम करतो. प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर कोरोनाच्या विषाणूने विशेष फरक पडणार नाही, असे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून सातत्याने सांगण्यात येत आहे. ही प्रतिकारशक्ती म्हणजे काय? याविषयी काही डॉक्टरांबरोबर संवाद साधला असता त्यांनी भारतीय आहार पद्धतीचे महत्त्व उलगडून दाखविले. गेल्या काही वर्षांत घराबाहेरच्या खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील मेदाचे प्रमाण वाढून प्रतिकारशक्ती कमी होत चालली असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. विशेष म्हणजे, आयुर्वेदिक व अ‍ॅलोपथी या दोन्ही उपचार पद्धतींमधील डॉक्टरांचे एरवी औषधोपचारांबाबत मतभेद असले, तरी याविषयी मात्र एकमत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) माजी अध्यक्ष डॉ. मोहन जोशी म्हणाले, ‘‘प्रतिकारशक्ती म्हणजे शरीरात बाहेरून प्रवेश करणाºया विषाणू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत क्षमता. ती काही जन्मजात नसते. ती कमी-जास्त होते; मात्र त्याला ती व्यक्तीच कारणीभूत असते. अतिश्रम, आहार वेळेवर नसणे, चुकीचा म्हणजे अती तिखट- अती तेलकट असा असणे, त्यात बदल न करणे, झोप पुरेशी न घेणे या सगळ्या गोष्टी प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरतात. असे केले नाही, तर प्रतिकारशक्ती निश्चितपणे वाढते. मोसमी फळे, पोळी-भाजी, त्यातही पालेभाज्या व ताक, असा आहार आणि पुरेशी झोप घेतली, तर प्रतिकाराच्या क्षमतेत वाढ होते व असा किमान साथीचा म्हणजे संसर्गजन्य आजार तरी त्वरित होणार नाही.’’आयएमएच्याच पदाधिकारी पद्मा अय्यर म्हणाल्या, ‘‘प्रतिकारशक्ती म्हणजे शरीरातील वेगवेगळी प्रथिने (प्रोटिन), कर्बोदके (कार्बोहायड्रेड), जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन)  यांचे प्रमाण व्यवस्थित असणे. ते नीट असले तर प्रतिकारशक्ती चांगली असते व त्यामुळे शरीर कोणत्याही विषाणूचा सक्षमपणे प्रतिकार करू शकते.ताज्या फळांचा रस किंवा ती खाल्ली तरीही प्रतिकारशक्तीत वाढ होते. मात्र, आपण फळे खात नाही. थंड झालेले अन्न प्रतिकारशक्तीचा ऱ्हास करीत असते. गरम अन्न खाल्ले, तर त्यातील सर्व घटक शरीराला मिळतात. या सर्व गोष्टींच्या जोडीला व्यायामही हवा. तो नियमित असला तर चांगलेच.’’.............* प्रतिकारशक्ती म्हणजे काय?श्वास किंवा घशावाटे शरीरात येणाऱ्या बाहेरच्या विषाणूंना प्रतिकार करण्याची शरीराची क्षमताशरीरावर आघात करणाऱ्या या विषाणूंना शरीरात आधीच असलेल्या पेशी निष्प्रभ करतातविषाणूंचा हल्ला बराच वेळ चालला तरीही त्यांच्यासमोर टिकाव धरण्याची शरीरातंर्गत क्षमता कोणतेही औषध न घेता विषाणूंना निष्प्रभ करण्याची शरीराची शक्ती...........* प्रतिकारशक्ती कशी वाढवायची?हंगामातील ताजी फळे खाणे किंवा त्यांचा रस पिणे.पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करणे.जेवणातील सर्व पदार्थ ताजे व गरम खाणे.जेवणाच्या वेळांचे पालन करणे.मोकळ्या, शुद्ध हवेत नियमित व्यायाम करणे.प्राणायामाद्वारे फुप्फुसातील शक्ती वाढवणेकिमान सहा तासांची शांत झोप घेणे.प्रतिकारशक्ती कमी कधी होते?शिळे व थंड झालेले अन्न खाणे.तळलेले, तिखट पदार्थ सातत्याने खाणे.फ्रिजमधील पदार्थांचे नियमित सेवन करणे.फळांमधून मिळणाºया जीवनसत्त्वांची कमतरता.पालेभाज्या, कडधान्ये यातून मिळणाऱ्या प्रथिनांचा अभाव.पुरेशी झोप न होणे..........आयुर्वेदात प्रतिकारशक्तीबाबत बरेच काही आहे. आहार, विहार, निद्रा अशा अनेक गोष्टींबाबत बारकाईने सांगितले आहे. त्या-त्या मोसमातील फळे, भाज्या आहारात ठेवल्या तरीही फार मोठा फरक पडतो. रोज किमान सहा तासांची झोप आवश्यक आहे. नोकरी, उद्योग-व्यवसाय व एकूणच जगण्याच्या लढाईत नेमके चांगले जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींकडेच आपण दुर्लक्ष करतो. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होते व आजारांचा सामना करावा लागतो. कोरोनाला जिंकायचा असेल, तर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. - वैद्य सुभाष शितोळे.............* उन्हामध्ये उभे राहा .. सूर्यप्रकाशात उभे राहिल्यास ते शरीरासाठी रोगनिवारणाचे काम करते. शरीर आणि त्वचेला सूर्यप्रकाश आजारांपासून दूर ठेवतो. नियमित सूर्यप्रकाशात गेल्यास शरीरात पांढºया पेशींची वाढ होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्ही निरोगी राहता. रक्तप्रवाह देखील चांगला होतो. 

.....................................

* या गोष्टी नियमित करा किचनमध्ये हळद, आद्रक, लसूण, लवंग, इलायची आदींचे सेवन करा. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. तुळशीचाही वापर करावा. कडुनिंब हा आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. कडुनिंबाच्या झाडाखाली बसले तरी तुमचे आरोग्य चांगले राहील. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्नfruitsफळेvegetableभाज्या