पुणे :पुण्यात आणखी एका कोरोनाग्रस्ताची भर पडली असून एका ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतातही आता वेगाने प्रादुर्भाव होताना दिसत आहे. फक्त महाराष्ट्रात शुक्रवारी तब्बल २३ रुग्णांची भर पडली असून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १५४वर जाऊन पोहोचली आहे. आत या विषाणूच्या प्रादुर्भावातील तिसरा महत्वपूर्ण टप्पा सुरू झाला असून अधिकाधिक नागरिकांनी घरी राहावे म्हणून १४ एप्रिलपर्यंत देशभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याला प्रतिसाद मिळत असला काही नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. त्यांना मागील चार दिवसांपासून समजावून झाल्यावर आता पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान पुण्यात चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा कोणताही परदेश प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे त्याला कुठून लागण झाली याचा शोध घेतला जात आहे, संबंधित व्यक्तीला मधुमेहाचा विकार असून त्यांच्यावर शहरातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समजते. त्यामुळे सध्या पुण्यात १८ तर पुणे जिल्ह्यात तीन अशी असे एकूण २१ रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत.