Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील धोका पाहता लहान मुलांसाठी राखीव बेड ठेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 02:21 PM2021-05-22T14:21:11+5:302021-05-22T14:22:45+5:30

बारामती तालुक्यामध्ये कोरोनाची तिसरी संभाव्य  कोरोनाची संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा...

Corona Virus : Keep a reserved bed for children in view of the danger of the third corona wave: Deputy Chief Minister Ajit Pawar | Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील धोका पाहता लहान मुलांसाठी राखीव बेड ठेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील धोका पाहता लहान मुलांसाठी राखीव बेड ठेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

Next

बारामती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन सर्व विभागांनी प्रभाविपणे यंत्रणा राबवावी. या लाटेमध्ये लहान बालके बाधित होण्याचा धोका संभावतो आहे,  तरी  त्यांच्यासाठी रुग्णालयामध्ये  स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्यायबाबत कार्यवाही करावी,अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुभार्वाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी शनिवारी (( दि.२२) घेतला. यावेळी ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले,  बारामती तालुक्यामध्ये कोरोनाची तिसरी संभाव्य  कोरोनाची संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा. रुग्णालयात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे, सर्व रुग्णालयामध्ये फायर व ऑक्सिजन ऑडिट वेळेवर करुन घ्यावे, सर्व रुग्णालयामध्ये जनरेटरची सुविधा असणे आवश्यक आहे.  कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे, ही बाब दिलासादायक आहे. तथापि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कोणत्याही रुग्णांलयामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी.  

 

म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. या रोगासाठीच्या औधषांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार न होता योग्य वापर व नियोजन करण्यात यावे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसिस अथवा अन्य काही लक्षणे दिसल्यास याची माहिती दूरध्वनीवरुन घेण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  यावेळी  नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती निता फरांदे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,  उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील,  मुख्याधिकारी किरणराज यादव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.

Read in English

Web Title: Corona Virus : Keep a reserved bed for children in view of the danger of the third corona wave: Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.