पुणे : राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात आढळला. त्यानंतर देशातील सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात झाले. त्यामुळे आतापर्यंत सर्व सण साधेपणाने साजरे केले. लोकांनी काळजी न घेतल्याने बेड मिळणेही कठीण झाले होते. पण आता परिस्थिती सुधारत आहेत. तरीही पुरेशी दक्षता घेऊन पुण्याला देशातील पहिले कोरोनामुक्त शहर करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यासाठी शासन निधीसह सर्वप्रकारची मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयामध्ये ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, संचालक शंकर पवार आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. दुसरी लाट डिसेंबर -जानेवारीमध्ये आली तरी आपण पुर्ण तयारी केली आहे. सध्या बेड शिल्लक आहेत. पण जनतेने काळजी घेतली तरच यश मिळेल. मास्कच्या कारवाईत जिल्ह्यात साडे बारा कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. असे दुर्लक्ष करू नका. त्याची आधी जबरदस्त किंमत मोजावी लागली आहे.मोहोळ यांनी आता जनजागृतीवर अधिक भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले. जगताप यांनी कोरोना जनजागृतीसाठी पीएमपी तत्पर असल्याचे सांगत आपली भुमिका स्पष्ट केली.-------------पीएमपी बसमध्ये जनजागृती संदेशअभियानांतर्गत ५०० पीएमपी बस व स्थानकांवर कोरोनाविषयी जनजागृती करणारे संदेश लावले जाणार आहेत. त्याचे अनावर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी पवार यांनी पीएमपीच्या काही बसची पाहणी करून अभियानाची सुरूवात केली. यावेळी कर्मचाºयांना कोरोना जगजागृती शपथही देण्यात आली.
Corona Virus : आता पुण्याला देशातील पहिले कोरोनामुक्त शहर बनवू या : अजित पवार यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 9:01 PM
लोकांनी काळजी न घेतल्याने बेड मिळणेही कठीण झाले होते. पण आता परिस्थिती सुधारत आहेत..
ठळक मुद्देस्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयामध्ये ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या अभियान उद्घाटन