पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत शुक्रवारी आजवरची सर्वाधिक १ हजार ७०५ रूग्णांची भर पडयाली असून यामध्ये रॅपिड अँटिजेन किटद्वारे निष्पन्न झालेल्या ८५० रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ३४ हजार ४० झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ७७३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ५२७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १२ हजार १६ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५२७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४४५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
दिवसभरात ११ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ९१७ झाली आहे. दिवसभरात एकूण ७७३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २१ हजार १०७ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १२ हजार १६ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ११ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ९१ हजार ५०८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे २ हजार ८०० लोकांची तपासणी करण्यात आली आहे. दोन्ही मिळून एकाच दिवसात ६ हजार ८११ जणांची तपासणी दिवसभरात करण्यात आली आहे.