पुणे : शहरात मंगळवारी १७६ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २४७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ६९२ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ६़५३ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये १५५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २११ इतकी आहे.आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७६८ इतकी झाली आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही आजमितीला १ हजार ७३५ इतकी आहे.
शहरात आजपर्यंत १० लाख ३३ हजार १२६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९२ हजार १८१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.यापैकी १ लाख ८५ हजार ६७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.