पुणे : शहरात मंगळवारी १८२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३३५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ३४० संशयितांची तपासणी करण्यात आली़.तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ७.७ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २०३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २८७ इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ३०४ इतकी आहेत. आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ६ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७१४ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ९ लाख ८५ हजार ५०४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८३ हजार ४७७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७६ हजार ४५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.