पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात १९२ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या २३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ५७३ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, २७८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ७०० झाली आहे. दिवसभरात एकूण २३४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७५ हजार ६२८ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८२ हजार ९०१ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ५७३ झाली आहे. ------------- दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ४९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९ लाख ७७ हजार ९१७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.