पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. शुक्रवारी दिवसभरात २ हजार ८३४रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ८०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४९९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १८ हजार ८८८ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४९९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ८८४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात १५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार १७ झाली आहे. पुण्याबाहेरील १३ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ८०८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ५ हजार ४७८ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख २९ हजार ३८३ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १८ हजार ८८८ झाली आहे. ------------- दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १२ हजार ६२५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख ९९ हजार ३८६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.