पुणे : शहरात गुरूवारी २५८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २५५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ७९५ संशयितांची तपासणी करण्यात आली. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४१३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २३७ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार ५५ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ८२ इतकी आहे. आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला असून, यातील २ जण पुण्याबाहेरील आहे.शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५२२ इतकी झाली आहे. शहरात आजपर्यंत ८ लाख ५२ हजार ८०१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७३ हजार १५५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६३ हजार ५५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़. ========================
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ११४ कोरोनाबाधित पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ११४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे. २९४ जण कोरोनावर मात केली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ९३ हजार ९२८ वर पोहचली असून, यापैकी, ९० हजार ४७३ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७९४ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.