पुणे : शहरात रविवारी २९२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ४७० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ८८३ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही १०.१२ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३८७ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २२६ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या ८५८ इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ४ हजार ९७ इतकी आहेत. आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६१३ इतकी झाली आहे. शहरात आजपर्यंत ९ लाख ४ हजार ६८९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७७ हजार ८७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६९ हजार १६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ==========================पिंपरी १०४ कोरोनामुक्त, २०२७ जणांना डिस्चार्ज पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसभरात ९४ जण पॉझिटिव्ह आढळले असून १०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनाने पाच जणांचा बळी घेतला आहे. १ हजार ७३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.गेल्या तीन चार दिवसांत वाढलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात २ हजार २२० जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ७३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ४२१ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात २ हजार o२७ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ७६६ वर पोहोचली आहे...............................कोरोनामुक्त वाढले कोरोनामुक्तांचा आलेख वाढला आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२ हजार ७७९ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६ हजार १३७ वर पोहोचली आहे...........मृतांचा आलेख वाढला कोरोनाचा विळखा सैल होत असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदरही कमी झाला आहे. गुरूवारी शहरातील पाच आणि शहराबाहेरील तीन अशा एकूण आठ जणाचा बळी घेतला आाहे.