पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शुक्रवारी दिवसभरात २९८ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ६१ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८२७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५६४ झाली आहे. दिवसभरात एकूण २७६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७९० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७५ हजार ४१५ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ६१ झाली आहे. ------------- दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ६५८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ७९ हजार २०६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
....... पिंपरीत १२२ जण कोरोना पॉझिटिव्ह पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरानाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असून शहरातील सात आणि शहराबाहेरील तीन अशा दहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसभरात १२२ जण पॉझिटिव्ह आढळले असून ९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ४८३ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात नाव्हेंबरच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णसंख्या अडीचशेच्या आत आली होती. ही आता दीडशेच्या आत आली आहे. मात्र, कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात २ हजार ५१० जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी २ हजार ०७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ६७४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या ७१९ वर पोहोचली आहे.
कोरोनामुक्तीचा आलेख वाढत असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजार ७०७ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९५ हजार ०७० वर पोहोचली आहे. दोन दिवसात कोरोनामुक्तांची संख्या कमी होत असताना दिसत आहे.