पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ४१४ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या २४७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १६० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ५६१ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ३४५ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. पुण्याबाहेरील एका मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ८२१ झाली आहे.
दिवसभरात एकूण २४७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ८९ हजार ९४८ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ९७ हजार ३३० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ५७१ झाली आहे. ------------- दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ६३४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १० लाख ९४ हजार ४२७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.