पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मंगळवारी ६ हजारांवर नवे कोरोनाबाधित आढळले आहे.तर जवळपास ६ हजार ५५ लोकांनी कोरोनावर मात केली.
पुणे शहरात मंगळवारी ३ हजार २२६ तर पिंपरीत १ हजार ८३७ रुग्णांची भर पडली. तसेच पुणे शहरात ३ हजार २६८ तर पिंपरीत १४२० जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील आत्तापर्यंतची कोरोना रुग्३२ हजार ८०६ झाली आहे. आणि पिंपरीत १६ हजार ९५० इतकी आहे.पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९ हजार ९१८ झाली आहे. तर शहरात संख्या ५ हजार ४३९ झाली आहे.
पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५६ हजार ९४८ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ५लाख २५ हजार ८०६ झाली आहे. हॉस्पिटलमधील सक्रिय रूग्णांची संख्या १४ हजार २४२ असून गृह विलगिकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४४ हजार ८६७ झाली आहे. ------------- शहरात दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १३हजार ४३६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली. तर जिल्ह्यात २१ हजार १२ रुग्णांची स्वाब तपासणी करण्यात आली.