पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. बुधवारी तर कोरोना रुग्ण वाढीचा उच्चांक गाठला गेला. तब्बल ६ हजार ७४१ रुग्णांची वाढ झाली.तसेच ३ हजार २२१ जणांनी कोरोनावर मात केली. पिंपरीत देखील बुधवारी वर्षातील सर्वाधिक १८६५ रुग्णवाढीची नोंद झाली.
पुणे शहरात बुधवारी एकूण ३ हजार ५०९ नवे कोरोनाबाधित आढळले असून १ हजार ४१० रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुणे शहरात प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २६ हजार ५१५ झाली आहे.
पुणे शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५८९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ११४ झाली आहे. पुण्याबाहेरील ९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण १४१० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ३० हजार ६२१ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ८६ हजार २६२ झाली आहे. हॉस्पिटलमधील सक्रिय रूग्णांची संख्या ९ हजार १७१ असून गृह विलगिकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या ३६ हजार ९५७ झाली आहे. ------------- शहरात दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १६ हजार १८५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली. तर जिल्ह्यात २४४५३ रुग्णांची स्वाब तपासणी करण्यात आली.