पुणे : शहरात कोरोनाबाधित वाढीचा आकडा सोमवारी ४०६ इतका खाली गेला होता. मात्र, आज पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या ६८८ कोरोनाबाधित आढळून आले आहे. आज दिवसभरात ६ हजार १२४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ११. २३ टक्के इतकी आहे. दरम्यान, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या (अॅक्टिव्ह पेशंट) पुन्हा ५ हजाराच्या पुढे गेला असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ९१ इतकी झाली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचवाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाºया कोरोनाबाधितांची संख्या ६२८ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २७८ इतकी आहे. दरम्यान आज दिवसभरात ४९८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आजपर्यंत ११ लाख ५४ हजार ७८५ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ३ हजार ७९६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९३ हजार ८४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ==========================