पुणे : शहरातील कोरोनावाढीतांची संख्या शुक्रवारीही कायम असून, आज दिवसभरात ७२७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये प्रथम संशयितांच्या तपासणीचा आकडा सात हजाराच्या पुढे गेला असून, आज विविध प्रयोगशाळांमध्ये ७ हजार १०८ तपासण्या करण्यात आला.तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १०.२२ टक्के आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहावाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ४४९ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २४५ इतकी आहे. तर आज दिवसभरात ३९८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही पुन्हा चार हजाराच्या वर गेली असून, आजमितीला शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ४ हजार २५३ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ११ लाख २८ हजार ३३२ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख १ हजार १८९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९२ हजार ८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे. --------------------------