शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी वर्षभरातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची वाढ; २ हजार ७५२ नवे रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 8:53 PM

शहरात आजपर्यंत १२ लाख ८६ हजार ७६१ हजार जणांची कोरोना तपासणी

ठळक मुद्देगेल्या वर्षभरात कोरोनाने घेतला ५ हजार २ जणांचा बळी

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची वाढ सातत्याने होत असून, गेल्या वर्षभरात सर्वाधिक रूग्णवाढ एकाच दिवसात म्हणजे गुरूवारी (दि़१८ मार्च) आढळून आली आहे. आज दिवसभरात तब्बल २ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २३.२५ टक्के इतकी आहे. 

दरम्यान, आज दिवसभरात मृत्यूची संख्याही वाढली असून, आज शहरातील २२ जणांचा तर शहरात उपचार घेणाऱ्या पुण्याबाहेरील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही सातत्याने वाढत असून आजमितीला शहरात १६ हजार ८७७ सक्रिय रूग्ण आहेत. 

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये दिवसभरात ११ हजार ८३५ जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली आहे. सध्या शहरात ४४० गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, ८४६ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार चालू आहेत. आज दिवसभरात ८८५ जण कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद घेण्यात आली आहे. 

शहरात आजपर्यंत १२ लाख ८६ हजार ७६१ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख २६ हजार ५४९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ४ हजार ६७० जण कोरोनामुक्त झाले आहेत़  आज २२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, शहरातील एकूण मृत्यूची संख्या आता पाच हजाराच्या पुढे गेली असून, गेल्या वर्षभरात ५ हजार २ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.                 ================= 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका