पुणे : शहरात मंगळवारी २३४ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून,३०६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ५४० संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ९.२१ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३९१ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २२६ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर शहरातील आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ८६० इतकी आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार २० इतकी आहे.आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून, शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५८७ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ८ लाख ८९ हजार ३४६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७६ हजार ४६२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६६ हजार ८५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
==========================