पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. मंगळवारी दिवसभरात ३ हजार ९८ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या १६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ५५५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २४ हजार ४४० झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५५५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, १०२० रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात २२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ९० झाली आहे. पुण्याबाहेरील ९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण १६९८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ११ हजार ३०४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ४० हजार ८३४ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २४ हजार ४४० झाली आहे. ------------- दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ११ हजार ३१० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १३ लाख ४९ हजार ९९९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.