शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी दिवसभरात ४२८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; २६२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 8:12 PM

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १४५ जणांची प्रकृती चिंताजनक  आहे

पुणे : शहरातील नव्या कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला असून, बुधवारी शहरात कोरोनाबाधितांची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. २८ नाव्हेंबरनंतर शहरात प्रथमच आज ४२८ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ९़९४ टक्के इतकी आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यानंतरची शहरातील ही सर्वाधिक रूग्णवाढ आहे.शहरातील कोरोना तपासणीचे प्रमाणही बुधवारी वाढले असून, शहरातील १७ स्वॅब सेंटरवर दिवसभरात ४ हजार ३०४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या १ हजार ८८१ वर गेली असून, २९० रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. तर विविध रूग्णालयांमध्ये १४५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत़ आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत.

शहरात आजपर्यंत १० लाख ८१ हजार ११५ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९५ हजार ९२४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८९ हजार २३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल