पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची वाढ रविवारपासून एक हजाराच्या आतच होत असून, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण मात्र वाढीच्या दुप्पटीने झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची तपासणीही दररोज चार ते पाच हजाराच्या संख्येने होत आहे. पण कोरोनाबाधितांची वाढ ही सातत्याने कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र शहरात पाहण्यास मिळत आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ५ हजार ४३८ तर मंगळवारी ४ हजार ३३४ नागरिकांची कोरोनाची तपासणी करण्यात आली़ तपासणीचे हे प्रमाण व आज प्राप्त झालेले तपासणी अहवाल पाहता, साधारणत: दहा हजारामागे ९६९ कोरोनाबाधित आढळले असून, हे प्रमाण केवळ ९.७ टक्क्यांवर आले आहे़. आजमितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९०८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहे़. यापैकी ४९३ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर २ हजार ९०३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. दिवसभरात २९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ७ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५१ हजार ४०२ झाली असून, यापैकी अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ७१ इतकी असून ही टक्केवारी ९.२ इतकी आहे. आजपर्यंत १ लाख ३३ हजार ६०० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर ३ हजार ७३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. -----------------------------------
Corona virus news : दिलासादायक ! पुणे शहरातील कोरोनाबाधितांची वाढ रविवारपासून १ हजाराच्या आतच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 12:20 PM
साधारणत:दहा हजारामागे आढळले ९६९ कोरोनाबाधित
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून कोरोनाची तपासणीही दररोज चार ते पाच हजाराच्या संख्येने शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५१ हजार ४०२ ; अॅक्टिव्ह रूग्ण १४ हजार ७१आजपर्यंत १ लाख ३३ हजार ६०० जण कोरोनामुक्त