Corona virus News : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला तब्बल ७ हजारांवर; ३,७५६ रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 10:10 PM2021-03-26T22:10:12+5:302021-03-26T22:10:31+5:30

पुणे शहरात शुक्रवारी एकूण ३ हजार ५९४ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

Corona virus News: The number of coronavirus victims in Pune district reached 7,000 on Friday; 3756 patients were cured | Corona virus News : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला तब्बल ७ हजारांवर; ३,७५६ रुग्ण झाले बरे

Corona virus News : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला तब्बल ७ हजारांवर; ३,७५६ रुग्ण झाले बरे

Next

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. शुक्रवारी तर कोरोना रुग्ण वाढीचा उच्चांक गाठला गेला. तब्बल ७ हजार ९० रुग्णांची भर पडली. झाली. तसेच ३ हजार ७५६ जणांनी कोरोनावर मात केली. पिंपरीत दिवसभरात १८२५ नवीन रुग्ण आढळून आले. 

पुणे शहरात शुक्रवारी एकूण ३ हजार ५९४ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात  विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुणे शहरात प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २९ हजार ९८३ झाली आहे. पुणे शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६१२जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार १६१ झाली आहे.आज दिवसभरात पुणे शहरात २४  पुण्याबाहेरील ७ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
दिवसभरात एकूण २१६५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. 

पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ३७ हजार १८५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ९९ हजार ७८४ झाली आहे. हॉस्पिटलमधील सक्रिय रूग्णांची संख्या ११ हजार ३४३ असून गृह विलगीकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४१ हजार ६६५ झाली आहे.  
-------------   
शहरात दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १६हजार ७९९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली. तर जिल्ह्यात २७ हजार २०१ रुग्णांची स्वाब तपासणी करण्यात आली.

.......

पिंपरीत १८२५ पॉझिटिव्ह, ८८६ जण कोरोनामुक्त

पिंपरी : महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. दिवसभरात १ हजार ८२५ रुग्ण सापडले असून ८८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सात जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ४ हजार ७३० जणांना डिस्चार्ज दिला आहे. पिंपरी, काळेवाडी,भोसरी, चिंचवड आणि सांगवीत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. पंधराशे पर्यंत गेलेली संख्या अकराशे पर्यंत खाली आली होती. मात्र, सहा दिवसापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ५ हजार ६७६ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ४हजार ७१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ०८५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या २ हजार २६२ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ४ हजार ७३० जणांना डिस्चार्ज दिला आहे.
 ............................  

साडेचार हजार जणांचे लसीकरण कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढत आहे. शहरातील महापालिकेच्या ११ आणि खासगी १२ अशा केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात आज ३ हजार ७५०  जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह ४ हजार ६८४ जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १ लाख १६ हजार १४१ वर पोहोचली आहे.

Web Title: Corona virus News: The number of coronavirus victims in Pune district reached 7,000 on Friday; 3756 patients were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.