शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

Corona virus News : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला तब्बल ७ हजारांवर; ३,७५६ रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 10:10 PM

पुणे शहरात शुक्रवारी एकूण ३ हजार ५९४ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. शुक्रवारी तर कोरोना रुग्ण वाढीचा उच्चांक गाठला गेला. तब्बल ७ हजार ९० रुग्णांची भर पडली. झाली. तसेच ३ हजार ७५६ जणांनी कोरोनावर मात केली. पिंपरीत दिवसभरात १८२५ नवीन रुग्ण आढळून आले. 

पुणे शहरात शुक्रवारी एकूण ३ हजार ५९४ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात  विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुणे शहरात प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २९ हजार ९८३ झाली आहे. पुणे शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६१२जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार १६१ झाली आहे.आज दिवसभरात पुणे शहरात २४  पुण्याबाहेरील ७ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण २१६५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. 

पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ३७ हजार १८५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ९९ हजार ७८४ झाली आहे. हॉस्पिटलमधील सक्रिय रूग्णांची संख्या ११ हजार ३४३ असून गृह विलगीकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४१ हजार ६६५ झाली आहे.  -------------   शहरात दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १६हजार ७९९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली. तर जिल्ह्यात २७ हजार २०१ रुग्णांची स्वाब तपासणी करण्यात आली.

.......

पिंपरीत १८२५ पॉझिटिव्ह, ८८६ जण कोरोनामुक्त

पिंपरी : महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. दिवसभरात १ हजार ८२५ रुग्ण सापडले असून ८८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सात जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ४ हजार ७३० जणांना डिस्चार्ज दिला आहे. पिंपरी, काळेवाडी,भोसरी, चिंचवड आणि सांगवीत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. पंधराशे पर्यंत गेलेली संख्या अकराशे पर्यंत खाली आली होती. मात्र, सहा दिवसापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ५ हजार ६७६ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ४हजार ७१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ०८५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या २ हजार २६२ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ४ हजार ७३० जणांना डिस्चार्ज दिला आहे. ............................  

साडेचार हजार जणांचे लसीकरण कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढत आहे. शहरातील महापालिकेच्या ११ आणि खासगी १२ अशा केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात आज ३ हजार ७५०  जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह ४ हजार ६८४ जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १ लाख १६ हजार १४१ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्तPoliceपोलिसAjit Pawarअजित पवार