पुणे : शहरात गुरूवारी ३ हजार ६४५ कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये ४३० जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे़ तर आज ३८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहापर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४०३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैक २४८ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार ९३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ३१७ इतकी आहे़. आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला असून, शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ४४९ इतकी झाली आहे. आजपर्यंत ८ लाख ३ हजार ८७१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ६८ हजार ४६० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ५८ हजार ६९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ==========================पिंपरीत ३ हजार ४७१ जणांना डिस्चार्ज; १३ जणांचा मृत्यूपिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होत असून दिवसभरात १३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसभरात ३ हजार ६१९ जणांची तपासणी केली असून त्यात २३१ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ४७१ जणांना डिस्चार्ज दिला आहे. मृत्यूदर वाढू लागला आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात ३ हजार ६१९ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ३ हजार २०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ४४१ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात ३ हजार ४७१ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ८७६ वर पोहोचली आहे...............................कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी रुग्ण संख्या तिपटीने वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही घटत असल्याचे दिसून येत आहे. शहर परिसरातील ८५ जण कोरोनामुक्त झाले असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८७ हजार ६३४ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१ हजार ५१५ वर पोहोचली आहे.
Corona Virus News : पुणे शहरात ४३० तर पिंपरीत २३१ कोरोनाबाधितांची गुरूवारी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 8:27 PM
आजपर्यंत पुणे शहरात८ लाख ३ हजार ८७१ जणांची कोरोना तपासणी
ठळक मुद्देपुणे शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ३१७ इतकी