पिंपरी : कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन डॉक्टर आणि एक कर्मचारी आहे.या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. या तिघांचाही दुसरा डोस घेणे बाकी आहे. अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.
कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यावर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे म्हणाले की, पहिला डोस घेतल्यानंतर साधारण ८ ते १० दिवसानंतर शरीरात एन्टीबॉडीज तयार होतात. तसेच पहिल्या डोस नंतर साधरण ६५ टक्के प्रतिकारक्षमता तयार होते. दुसऱ्या डोस घेतल्यावर १० ते १५ दिवसानंतर शरीरात उर्वरित एन्टीबॉडीज तयार होतात. दोन्ही डोस घेतल्यावर साधारण ७० ते ९० टक्के प्रतिकारक्षमता तयार होते.
आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन कर्मचारी यांना लस देण्याचा कार्यक्रम सध्या शहरात सुरू आहे. मागील काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन महापालिेने केले आहे. शहरात आतापर्यंत २०६४६ जणांनी घेतली लस घेतली आहे.
कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे दुसरा डोस घेतला नाही...कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी एकाने पाच फेब्रुवारीला, दुसऱ्याने 25 जानेवारी तर तिसऱ्याने 16 जानेवारी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. 16 जानेवरील ज्याने लस घेतली त्याला दुसरा डोस 14 फेब्रुवारीला मिळणे अपेक्षित होते. परंतु त्यावर महापालिका उत्तर देत नाही. कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे त्यांनी दुसरा डोस घेतला नाही असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.