पुणे : मागील सात महिन्यांत खऱ्या अर्थाने 'जम्बो' रुग्णालय ठरलेल्या ससून रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या शंभरच्या खाली आली आहे. मागील पाच महिन्यांत पहिल्यांदाच एवढी सुसह्य स्थिती निर्माण झाल्याने येथील डॉक्टर व परिचारिकांवरील ताण कमी झाला आहे. मंगळवार (दि. १३) पर्यंत रुग्णालयात एकुण ४ हजार ३५८ कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार ५८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्ण दाखल होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर १५ दिवसांतच ११ मजली नवीन इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. तेव्हापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत ससूनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेली. जवळपास ४५० हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू होते. त्याचबरोबर सारी व अन्य श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांवरही कोविड केंद्रात उपचार सुरू होते. त्यामुळे एकुण रुग्णांचा आकडा ५०० च्या पुढे होता. परिणामी, रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर व संपुर्ण यंत्रणेवरच मोठा ताण पडला होता. तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिका मिळविणेही कठीण जात होते.
रुग्णालयात २० मे ला रुग्णांचा आकडा शंभरीच्या पुढे गेला. त्यानंतर तीन महिन्यांत ४०० च्या पुढे रुग्ण झाले. पुढील महिनाभर ४०० ते ४५० दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण ससूनमध्ये उपचार घेत होते. त्यानंतर २४ सप्टेंबरला पहिल्यांदाच रुग्णसंख्या ४०० च्या खाली आली. तर पुढील १५ दिवसांत हा आकडा शंभरच्याही खाली आला. बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने ससूनप्रमाणेच अन्य रुग्णालयांवरीलही ताण कमी होत आहे. पण ससून रुग्णालयात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण उपचार घेत होते.--------------ससून कोविड केंद्रातील मंगळवारची स्थितीकोरोनाबाधित रुग्ण - ८४सारी व अन्य आजार - २२व्हेंटिलेटरवरील - ४४अन्य आजार असलेले - १९एकुण घरी सोडलेले - २,५८८एकुण बाधित दाखल - ४,३५८एकुण संशयित दाखल - १९,२२९------------------------------बाधित रुग्णांचे टप्पेरुग्णांमध्ये वाढ२० मे - १०८१२ जुलै - २१०३ ऑगस्ट ३०४२४ ऑगस्ट - ४१७------------------रुग्णसंख्या कमी२४ सप्टेंबर - ३९३१ ऑक्टोबर - २३४३ ऑक्टोबर १८७११ ऑक्टोबर ९४-------------------