शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Corona virus : पुणे शहरातील खासगी वाहनांची नोंद दोन वर्षांत घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 7:39 AM

मागील १५ वर्षांत तब्बल २७ लाख ८२ हजार ८०२ खासगी वाहनांची वाढ

ठळक मुद्देसार्वजनिक वाहतूक सक्षम न झाल्याने खासगी वाहनांच्या प्रमाणात अत्यंत वेगाने वाढ

पुणे : पालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहरातील खासगी वाहनांच्या नोंदीचे प्रमाण यंदा घटले असून गेल्या पाच वर्षात सार्वजनिक वाहनांच्या संख्येत २.४ पटीने वाढ झाली आहे. यामध्ये रिक्षा, टॅक्सी, कॅब, बसेस या वाहनांचा समावेश असून पर्यावरण अहवालानुसार, शहरात गेल्या दोन वर्षात नवीन वाहनांच्या नोंदणीमध्ये घट झाली आहे. 

यासोबतच दुचाकी खरेदीचे प्रमाणही खाली आले आहे. मार्च २०२० पर्यंत शहरातील एकूण दुचाकींच्या नोंदणीची संख्या १ लाख ६७ हजार ४०६ आहे. मार्च २०१९च्या तुलनेत ८ हजार ९०८ ने ही संख्या घटली आहे. यासोबतच मार्च २०२० पर्यंत शहरात ४६ हजार १५० मोटारींची नोंद झाली असून मार्च २०१९ च्या तुलनेत ही संख्या १ हजार ४६७ ने घटली आहे.

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम न झाल्याने खासगी वाहनांचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत आहे. शहरातील रस्त्यांची रुंदी कमी असल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. रस्त्यांवरील वाहतुकीचे प्रमाण आणि रस्त्यांची क्षमता यांचे गुणोत्तर ०.८ इतके अपेक्षित आहे. मात्र, खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हे गुणोत्तर सध्या १.४ इतके झाले आहे. त्याची परिणीती वाहतुकीची गती कमी होण्यात झाली आहे. एक लाख लोकसंख्येमागे ५५ बस अपेक्षित आहेत. मात्र, हे प्रमाण २८ बस पुरतेच मर्यादित आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या फेऱ्या ४८ टक्के असणे अपेक्षित आहे. ........रिक्षा, टॅक्सी, कॅब, बसेस या वाहनांची संख्या २०१५ साली ५९ हजार २४६ एवढी होती. तर पाच वर्षात म्हणजे २०२० पर्यंत या वाहनांच्या संख्येत २.४ पटीने वाढ होऊन ती १ लाख ४१ लाख २६५ झाली आहे. ३० लाख ४६ हजार दुचाकी वाहने आहेत.---------- गेल्या १५ वर्षांत वाढली २७ लाख वाहने

२००६ मध्ये नोंदणीकृत खासगी वाहनांची एकूण संख्या १३ लाख ५३ हजार ११३ होती. मार्च २०२० पर्यंत नोंदणीकृत वाहनांची एकूण संख्या ४१ लाख ३५ हजार ९१५ इतकी आहे. मागील १५ वर्षांत तब्बल २७ लाख ८२ हजार ८०२ खासगी वाहनांची वाढ झाली आहे.

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerदुचाकीfour wheelerफोर व्हीलर