पुणे : शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा गेल्या चार महिन्यात पहिल्यांदाच दहा हजारांच्या खाली गेला. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ९ हजार ८५८ झाली आहे. शनिवारी दिवसभरात ४१८ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ८६० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८२७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८६० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४४१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३८६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ३३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात २३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच पुण्याबाहेरील ६ रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार ९६४ झाली आहे. दिवसभरात एकूण ८६० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार २२९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ५७ हजार ५१ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ९ हजार ८५८ झाली आहे. ------------- दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ५०९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ६ लाख ९९ हजार ५८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.