विवेक भुसेपुणे : लॉकडाऊन शिथिल करताना कंटेंन्मेंट झोनमधील कडक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर तेथे सुक्ष्म नियोजन करुन तपासणी वाढविल्याने गेल्या २ लॉकडाऊनमध्ये तेथील नवीन कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. मात्र त्याच्याबाहेरील नागरिकांनी पुरेशी काळजी न घेतल्याने आता कटेंन्मेंट झोनपेक्षा बाहेरील भागात अधिक कोरोना बाधितांची संख्या दिसू लागली आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ४ मेपर्यंत ११ ठिकाणी २२८ रुग्ण होते. त्यानंतर तिसरा लॉकडाऊन संपत असताना १७ ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यांची संख्या ३३४ पर्यंत पोहचली होती. आता २७ मेपर्यंत २५ ठिकाणी कोरोना बाधित आढळून आले असून एकूण ४२४ रुग्ण झाले आहेत.
४ मेपासून २७ मे पर्यंत पहिल्या ११ ठिकाणी एकूण ७६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ४ मेनंतर नवीन १४ ठिकाणी तब्बल १२० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या असलेले पाटील इस्टेट, कामगार पुतळा, शिवाजीनगर स्टेशन, तानाजी वाडी येथील नव्या रुग्णांची वाढ जवळपास थांबली आहे. या उलट कटेंन्मेंट झोनमध्ये नसलेल्या जनवाडी, गोखलेनगर, वडारवाडी, महात्मा गांधी वसाहत येथील रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनो, आपल्या भागात सवलत दिली, याचा अर्थ कोरोनापासून तुम्ही मुक्त झाला असे नाही़ तर अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करा. गरज असेल तरच घराबाहेर पडा. अकारण घराबाहेर फिरु नका.* पाटील इस्टेट व परिसरात एकूण २१० कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. त्यातील २०२ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत..............घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील कोरोना बाधितांचा वाढता आलेख ४ मे ७ मे १२ मे १६ मे २० मे २४ मे २७ मेपाटील इस्टेट १५८ १५९ १७० १७२ १७२ १७२ १७३कामगार पुतळा २६ ३० ३८ ४५ ४६ ४६ ४६शिवाजीनगर स्टे. ११ १५ २५ २८ २९ २९ २९तानाजी वाडी १० ११ ११ ११ ११ ११ ११गावठाण ३ ३ ३ ३ ३ ३ ३विष्णुकृपानगर ४ ४ ८ १० १० १० १०रामोशीवाडी २ २ २ ४ ४ १० ११भोसलेवाडी ९ १० १० ११ १४ १४ १४पोलीस लाईन १ १ १ २ ५ ५ ५सकाळनगर १ १ १ १ १ १ १मॉडेल कॉलनी १ १ १ १ १ १ १संगमवाडी - ८ २१ २३ २३ २३ २३ हेल्थ कॅम्प - १ १ १ १ ११ १७जनवाडी - - १ १ ४ १४ २७वाकडेवाडी - - १ १ १ १ १वैदुवाडी - - १ १ १ २ २
गांधी वसाहत १९ १९ १९ १८गोखलेनगर - - - - - ३ ११वडारवाडी - - - - - २ १०घोले रोड - - - - - ३ ३फर्ग्युसन रोड - - - - - २ २से़ बापट रोड - - - - - - ३
शि.एसटी स्टँड - - - - - - १दीप बंगला चौक - - - - - - १मुळा रोड - - - - - - १
एकूण २२८ २५० ३११ ३३४ ३४९ ३८१ ४२४